मुंबई - गोवा महामार्गावर एसटी अपघात, १ ठार १५ जखमी

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. आज बुधवारी सकाळी चिपळूणजवळ वालोपे येथे मुंबई - गोवा महामार्गावर एसटी दरीत कोसळून १ ठार तर १५ जण जखमी झालेत. बोरिवलीहून साखरपा येथे जाणा-या एसटी बसला भीषण अपघात झाला.

Updated: Aug 27, 2014, 10:29 AM IST
मुंबई - गोवा महामार्गावर एसटी अपघात, १ ठार १५ जखमी title=

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. आज बुधवारी सकाळी चिपळूणजवळ वालोपे येथे मुंबई - गोवा महामार्गावर एसटी दरीत कोसळून १ ठार तर १५ जण जखमी झालेत. बोरिवलीहून साखरपा येथे जाणा-या एसटी बसला भीषण अपघात झाला.

बोरिवली - साखरपा ही बस मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरिवली आगारातून सुटली. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास चिपळूणजवळील वालोपेजवळ बस उलटली. या अपघातात एक प्रवासी मृत्यूमुखी पडला तर १५ जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

एकीकडे कोकण रेल्वेने दगा दिला असतानाच आता रस्ता वाहतूक धोकादायक ठरली आहे. रस्ते वाहतुकीवरही वाहनांची कोंडी होताना दिसत आहे. त्यामुळे कोकणात निघालेल्या गणेश भक्तांचा प्रवास खडतर झालाय. त्यामुळे कोकणात जाणारे चाकरमानी हवालदील झाले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.