मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

Updated: Sep 3, 2016, 12:42 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा title=

रायगड : चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांनी गर्दी केली आहे. मुंबई - गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी दिसत आहे. तर तसेच वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणेमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, गर्दीत वाढल्याने कोंडीचा प्रश्न निर्माण झालाय. मुंबई - पुणे एक्स्प्रेसवरुन जाण्यास मूभा देण्यात आली आहे. मात्र, आज शनिवार असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांबरांगा लागल्या आहेत. वाहनांच्या गर्दीमुळे सावरोली टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी इथं झाली आहे. पहाटेपासूनच एक्स्प्रेस वे वरच्या खालापूर टोलनाक्यावर दोन ते तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्यात.. लेन कमी पडत असल्याने पुणे मार्गे जाण्यासाठी दोन लेन खुल्या करण्यात आल्यात.. पाली खोपोली वाकण मार्गावरही वाहनांची गर्दी वाढलीय.. तर बोरघाट-खंडाळा घाटातही वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.. पोलिसांनी अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी महामार्ग पोलिसांसह पोलीस निरीक्षकही विशेष लक्ष देतायत..