...म्हणून मुस्लिम शेतकरी आत्महत्या करत नाही - नाना पाटेकर

महाराष्ट्रासह देशभर पडलेला दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या हा सध्या चिंतनाचा विषय ठरलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेऊन मदतीची तयारी दर्शवलीय. 

Updated: Sep 8, 2015, 01:04 PM IST
...म्हणून मुस्लिम शेतकरी आत्महत्या करत नाही - नाना पाटेकर title=

लातूर : महाराष्ट्रासह देशभर पडलेला दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या हा सध्या चिंतनाचा विषय ठरलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेऊन मदतीची तयारी दर्शवलीय. 

असाच पुढाकार अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनीही घेतलाय.  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतीसाठी त्यांनी बीडनंतर लातूरातही हजेरी लावली. 

या कार्यक्रमाच्या निमित्तानं, शेतकरी नेमके आत्महत्या का करतात? किंवा काही शेतकरी कितीही बिकट परिस्थिती असतानाही आत्महत्येचा मार्ग का स्वीकारत नाहीत? यावर नानानं मार्मिक मत व्यक्त केलंय. लातूरच्या मार्केट यार्ड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात नाना पाटेकरांच्या भाषणानं सर्वांनाच विचार करायला भाग पाडलंय. 

'आत्महत्या करणं हा गुन्हा आहे... देवाशी केलेली ही प्रतारणा आहे, असं कुराणात सांगितलं गेलंय. त्यामुळे मुस्लिम माणूस कधीही आत्महत्या करत नाही... एखादी तुरळक घटना असू शकते... कुराणातली हीच शिकवण आपणास खूप भावते' असं नानानं म्हटलंय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.