महाराष्ट्रातील सिल्व्हर मॅन तुम्ही पाहिला का

 राज्यात अनेक गोल्ड मॅनविषयी आपण ऐकलं असेल, पाहिलंही असेल. पण नंदुरबारच्या सातपुडा डोंगररांगांमध्ये साजरी करण्यात आलेल्या होळी उत्सवात सिल्हर मॅननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Updated: Mar 24, 2016, 06:37 PM IST
महाराष्ट्रातील सिल्व्हर मॅन तुम्ही पाहिला का  title=

नंदूरबार :  राज्यात अनेक गोल्ड मॅनविषयी आपण ऐकलं असेल, पाहिलंही असेल. पण नंदुरबारच्या सातपुडा डोंगररांगांमध्ये साजरी करण्यात आलेल्या होळी उत्सवात सिल्हर मॅननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

काठी इथल्या राजवाडी हळीत बेळाकुंड इथल्या दाजला इरमा तडवी यांनी एक, दोन नव्हे तर तब्बल साडेदहा किलो चांदीचे दागिने परिधान केले होते. 

15 चांदीच्या माळा, तोडे, बावठे, बसके असे विविध चांदीचे दागिने तडवी यांनी परिधान केले होते. त्यांच्यासोबकत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.