छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात सांगलीचे उमाजी पवार शहीद

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गावकऱ्यांना ढाल करून नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १४ जवान शहीद झाले. या हल्ल्यात सांगलीचे सीआरपीएफचे जवान उमाजी पवार हे ही शहीद झाले आहेत. 

Updated: Dec 3, 2014, 11:39 AM IST
छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात सांगलीचे उमाजी पवार शहीद title=

सांगली: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गावकऱ्यांना ढाल करून नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १४ जवान शहीद झाले. या हल्ल्यात सांगलीचे सीआरपीएफचे जवान उमाजी पवार हे ही शहीद झाले आहेत. 

सांगली जिल्ह्यातल्य़ा वडगाव इथले ते रहिवासी आहेत. त्यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच त्यांच्या गावावर शोककशा पसरलीय. त्यांच्या पश्चात आई-वडिल, भाऊ-बहिण, आजी असा परिवार आहे. आज वडगाव इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. 

उमाजी पवार हे मूळचे पैलवान होते. सैन्यात भरती होण्यापूर्वी त्यांनी अनेक कुस्तीची मैदानं गाजवली.  सैन्यात सेवा करण्याची त्यांची पहिल्यापासूनच इच्छा होती. त्यानुसार ते २०१० मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले. त्यांचा भाऊ मुरारजी हा सुद्धा सैन्यभरतीसाठी प्रशिक्षण घेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.