रूग्णालयाच्या छतावर अडकलेल्या ९ जणांना वाचवलं

झी 24 तासच्या पुढाकारामुळे, नाशिकमधून ९ जणांची पुराच्या तडाख्यातून सुखरुप सुटका झाली आहे. 

Updated: Aug 3, 2016, 08:21 PM IST
रूग्णालयाच्या छतावर अडकलेल्या ९ जणांना वाचवलं title=

नाशिक : झी 24 तासच्या पुढाकारामुळे, नाशिकमधून ९ जणांची पुराच्या तडाख्यातून सुखरुप सुटका झाली आहे. गोदावरीला आलेल्या पुरात नाशिक जिल्ह्यामधल्या सायखेडा गावातल्या प्राथमिक रुग्णालयात ९ जण मंगळवारी रात्री अडकले. या सर्वांनी रूग्णालयाच्या गच्चीवर आश्रय घेतला होता. 

अडकलेल्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. त्याची माहिती डॉक्टर रावसाहेब ओगले यांनी झी चोवीस तासचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांना कळवली. 

योगेश खरे यांनी त्यानंतर तातडीनं पावलं उचलत संबंधित बचावकार्य यंत्रणेला याची माहिती दिली. त्यानुसार पावलं उचलत, बचावपथकांनी त्या नऊ जणांची सुटका केली. याबाबत डॉक्टर रावसाहेब ओगले यांनी झी चोवीस तासचे विशेष आभार मानले.