31 डिसेंबरला बार पडले ओस

31 डिसेंबरच्या संध्याकाळी दारू पिण्यासाठी बारमध्ये जाणाऱ्यांची संख्या यंद्या मोठ्याप्रमाणात घटल्याची माहिती पुढे येतेय.

Updated: Jan 3, 2017, 05:15 PM IST
31 डिसेंबरला बार पडले ओस title=

मुंबई : 31 डिसेंबरच्या संध्याकाळी दारू पिण्यासाठी बारमध्ये जाणाऱ्यांची संख्या यंद्या मोठ्याप्रमाणात घटल्याची माहिती पुढे येतेय. बारमध्ये बसून दारू पिणाऱ्यांच्या संख्येत यंदा तब्बल 30 टक्के घट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेलं संबोधन ऐकता यावं यासाठी अनेक मद्यशौकिनांनी घरीच बसून नववर्षाचं स्वागत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईतल्या बऱ्याच हॉटेल्स आणि बारमधून होम डिलिव्हरी घेण्यावर भर दिलाय.

अबकारी विभागानं तात्पुरते दारू परवाने देण्यास मनाई केल्यानं यंदा राज्यभरातल्या दारू विक्रीत घटही बघायला मिळतेय. गेल्यावर्षी अबकारी विभागानं तात्पुरत्या दारू विक्रीचे 1800 परवाने दिले होते. यंदा म्हणजे 31 डिसेंबर 2016च्या निमित्तानं देण्यात आलेल्या परवान्यांमध्ये तब्बल 22 टक्के कपात दिसली.