अभिनेत्री ममता कुलकर्णीला नॉनबेलेबल वॉरंट

प्रकरणी ठाणे पोलिसांना ठाणे न्यायालयाने अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि ड्रॅग तस्कर विक्की गोस्वामी यांच्या विरोधात नॉनबेलेबल वॉरंट मिळाले आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 29, 2017, 09:12 AM IST
अभिनेत्री ममता कुलकर्णीला नॉनबेलेबल वॉरंट title=

ठाणे :  प्रकरणी ठाणे पोलिसांना ठाणे न्यायालयाने अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि ड्रॅग तस्कर विक्की गोस्वामी यांच्या विरोधात नॉनबेलेबल वॉरंट मिळाले आहे. आता ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ठाणे सत्र न्यायालयाचे  नॉनबेलेबल वॉरंट मुळे अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामी यांच्या गळ्याभोवती एफेड्रीन प्रकरणी फास आवळत चालला आहे. 

सोलापूरच्या कंपनीतून हस्तगत केलेला २ हजार कोटींचा एफेड्रीनचा कच्चा माल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५ आरोपीना अटक करण्यात  आली आहे. तर या प्रकरणात ५ आरोपी अद्याप फरारी आहेत. 

यात ममता कुलकर्णी , विक्की गोस्वामी आणि केनिया मधील डॉ अब्दुल्ला आणि त्याचे दोन साथीदार  असून ठाणे न्यायालयाचे न्यायमूर्ती पटवर्धन यांनी पाच फरारी आरोपी पैकी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामी यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. कायदेशीर प्रक्रियेतील हे पहिले पाऊल असून भविष्यात त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाईचे संकेत ही  ठाणे पोलिसांनी दिले आहेत.