पंकजा मुंडे शोधणार 'घर का भेदी'

 पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. पण त्या ऑडिओ क्लिप संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून अशा प्रकारची क्लिप कोणी व्हायरल केली याचा शोध घ्यावा, असेही निवेदनात म्हटले  असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

Updated: Oct 10, 2016, 07:49 PM IST
पंकजा मुंडे शोधणार 'घर का भेदी'  title=

बीड :  पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. पण त्या ऑडिओ क्लिप संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून अशा प्रकारची क्लिप कोणी व्हायरल केली याचा शोध घ्यावा, असेही निवेदनात म्हटले  असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे म्हणाल्या की,  या क्लिपवर मी काही बोलणार नाही. या क्लिपद्वारे समाज विघातक शक्ती समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे याची चौकशी मुख्यमंत्री साहेबांनी करावी. 

ऑडिओ क्लिप ही सुमारे २०० ते २५० माणसांशी संवाद करत असताना टेप करण्यात आल्याचे दिसते. त्यात मी स्पष्ट म्हटले आहे. की मला वाद नको. आपण त्याकडे दुर्लक्ष करू पण हा मुद्दा न घेतला इतर मुद्द्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मीही अशी क्लिप कोणी व्हायरल केली याचा शोध घेत आहे. तसा मुख्यमंत्र्यांनी शोध घ्यावा ही विनंती मी केली आहे.