राग अनावर झाल्याने पत्नीने पतीला शिकविला धडा, झोपला असताना ओतले उकळते पाणी

रागाच्या भरात झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी ओतले. यात पती २५ टक्के भाजला. दरम्यान, याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली. 

Updated: Dec 4, 2015, 05:14 PM IST
राग अनावर झाल्याने पत्नीने पतीला शिकविला धडा, झोपला असताना ओतले उकळते पाणी  title=

उल्हासनगर : रागाच्या भरात झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी ओतले. यात पती २५ टक्के भाजला. दरम्यान, याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली. 
 
झोपेत असलेल्या पती दिलीप शर्मा याच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी टाकल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. जखमी दिलीप याला  उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी हेमा शर्मा हिला केली. हा प्रकार घरगुती भंडानातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प ५ परिसरात आपल्या घरी दिलीप गाढ झोपला होता. रात्री एक वाजण्याच्या सुमार दिलीप याची पत्नी हेमा हिने उकळते पाणी झोपेत त्याच्या अंगावर ओतले. त्यामुळे अचानक झालेल्या या प्रकारामुळे दिलीप ओरडत घराबाहेर पाळला. त्यानंतर त्याने त्याच आवस्थेत त्याने पोलीस ठाणे गाठले. त्यांने पोलिसांत तक्रार दिली.
 
हेमा हिने दिलीपकडे त्यांचे राहते घर विकण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, दिलीपला घर विकायचे नव्हते. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद होते असे. याच वादातून काल रात्री तिने हे कृत्य केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.