रोकड जप्तीनंतर प्रणिती शिंदेंचा असाही सवाल

उमरगा येथे गाडीतून सुमारे 91 लाख 50 हजाराची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर लोकमंगलचे सर्वेसर्वा असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आलेत. 

Updated: Nov 21, 2016, 12:15 AM IST
रोकड जप्तीनंतर प्रणिती शिंदेंचा असाही सवाल title=

सोलापूर : उमरगा येथे गाडीतून सुमारे 91 लाख 50 हजाराची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर लोकमंगलचे सर्वेसर्वा असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आलेत. 

आयतेच कोलीत मिळालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा देशमुख यांना कोंडीत पकडलेय. देशमुखांचा पैसा मुख्यमंत्र्यांकडे चालला होता की पंतप्रधानांकडे असा सवाल कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलाय.  

आगामी नागपूर अधिवेशनात सुभाष देशमुख किंवा मंत्रीमंडळातील एकतरी विकेट घेणार असल्याचा निर्धार प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवलाय.