चक्क, वांगे 1 रुपया किलो

कमी वेळात जास्त उत्पादन देणारं नगदी पिक म्हणून शेतकरी दरवर्षी हिरव्या वांग्याची लागवड करतात. परंतु यावर्षी उत्पादन जास्त आणि खप कमी झाल्याने वांग्याचे दर १ रुपया प्रति किलो वर आल्याने अमरावती जिल्यातील वांगे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत.

Updated: Jul 29, 2014, 09:21 AM IST
चक्क, वांगे 1 रुपया किलो title=

अमरावती : कमी वेळात जास्त उत्पादन देणारं नगदी पिक म्हणून शेतकरी दरवर्षी हिरव्या वांग्याची लागवड करतात. परंतु यावर्षी उत्पादन जास्त आणि खप कमी झाल्याने वांग्याचे दर १ रुपया प्रति किलो वर आल्याने अमरावती जिल्यातील वांगे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत.

अमरावती जिल्ह्यात अंजनगाव तालुक्यातील पथ्रोट, भीलोना, करजगाव, शिरजगाव, असदपुर आणि परिसरातील गावात नगदी पिक म्हणुन शेतकरी दरवर्षी हिरव्या वांग्याची लागवड करतात. रोप टाकण्यापासून तर लागवडीपर्यंत वांग्याच्या शेतीला एकरी २५ हजार रूपये खर्च येतो. मात्र या वर्षी उत्पादन जास्त आणि खप कमी झाल्याने वांग्याचे दर १ रुपया प्रति किलो वर आलेत. त्यामुळे अमरावती जिल्यातील वांगे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत.
 
वांग्याच्या शेतीला मशागती पासुन आलेला खर्च आणि पडलेला भाव यामुळे या परिसरातील शेतकरी सध्या चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे या पिकाच्या नुकसानित अधिकच भर पडली. त्यामुळे काही शेतकरी तर वांग्याची लावलेली रोपे काढून फेकत आहेत. तर काही शेतकरी तोडलेली वांगे जनवरांना खाऊ घालत आहे.
 
बाजारात वांगी १५ ते वीस रुपये दराने मिळतात. मात्र कच्च्या मालाच्या आणि भाजीपाल्याच्या भावावर शेतकरी अथवा शासनाचे नियंत्रण नाही. उत्पादन जास्त झाल्याचे कारण पुढे करून व्यापा-यांनी संगनमत करून भाव पाडल्याचा आरोप होतोय. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.