चाळीसगावात घरावर सशस्त्र दरोडा, तरुणाचा खून

चाळीसगावमधील कोदगावमध्ये एका घरावर सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय. 

Updated: Jun 26, 2015, 10:57 AM IST
चाळीसगावात घरावर सशस्त्र दरोडा, तरुणाचा खून title=

जळगाव : चाळीसगावमधील कोदगावमध्ये एका घरावर सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय. 

शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडलीय. कृष्णा देशमुख यांच्या घरावर दरोडा घालण्यात आला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला राहुल देशमुख या तरुणावर दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यात या तरुणाचा मृत्यू झालाय. राहुल देशमुख असं हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

आठ लाखांचा ऐवज घेऊन दरोडेखोर फरार झाला आहे. दरोडेखोर काळ्या रंगाच्या स्कॉर्पियोतून फरार झाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.