सांगली पीडित महिला आत्महत्या प्रकरणी आरोपीला अटक

बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी अमित कुरणेला आज मुंबईत अटक करण्यात आली.  सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली. दुपारी अमितला घेऊन पोलीस सांगलीत आले. त्यावेळी मनसेच्या महिला कार्यकर्त्या स्वाती शिंदेंनी अमित कुरणेला मारहाण केली. शिंदेंनी त्याचा शर्टही फाडला. आता काही वेळातच त्याला कोर्टातही हजर करण्यात येणार आहे.

Updated: Aug 8, 2016, 03:59 PM IST
सांगली पीडित महिला आत्महत्या प्रकरणी आरोपीला अटक  title=

सांगली : बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी अमित कुरणेला आज मुंबईत अटक करण्यात आली.  सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली. दुपारी अमितला घेऊन पोलीस सांगलीत आले. त्यावेळी मनसेच्या महिला कार्यकर्त्या स्वाती शिंदेंनी अमित कुरणेला मारहाण केली. शिंदेंनी त्याचा शर्टही फाडला. आता काही वेळातच त्याला कोर्टातही हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान अमित कुरणेसोबत त्याची आई सुनिता कुरणे आणि अण्णासाहेब कुरणेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अत्याचार करणा-या आरोपीवर कारवाई होत नसल्यानं तीनं स्वतःचं जीवन संपवलं. आरोपीच्या शेतातील घरातच गळफास घेऊन महिलेनं आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं चिठ्ठीमध्ये आणि भिंतीवर आरोपीचं नाव लिहून ठेवलं. तिच्या आत्महत्येनंतर सुमारे तीनशे नागरिकांनी मिरज पोलीस ठाण्याला घेराव घातला. विशेष म्हणजे या प्रकरणात महिन्यापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता. मात्र संशयित आरोपीला अटक झालेली नाही. उलट आरोपीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पीडित महिलेवरच पोलिसांनी शनिवारी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.