शनीशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिला प्रवेश वाद कोर्टात

शनैश्वर देवस्थानासह केंद्र आणि राज्य सरकारलाही नोटीस बजावण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

Updated: Jan 28, 2016, 06:44 PM IST
शनीशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिला प्रवेश वाद कोर्टात title=

औरंगाबाद : शनैश्वर देवस्थानासह केंद्र आणि राज्य सरकारलाही नोटीस बजावण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

शनीशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिलांनाही प्रवेश मिळावा या मागणीसाठी जालन्याच्या डॉक्टर वसुधा पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केलीय. त्यावर खंडपीठानं हे आदेश दिलेत.

मात्र याबाबत कोणताही अंतरीम आदेश देण्यास न्यायालयानं नकार दिलाय. पुढली सुनावणी  १६ फेब्रुवारीला होणार आहे.

पाहा व्हिड़िओ :