ठाण्याच्या महिला पोलीस मारहाणीला वेगळं वळण

शिवसेनेच्या शाखाप्रमुखानं महिला कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.

Updated: Apr 23, 2016, 04:50 PM IST
ठाण्याच्या महिला पोलीस मारहाणीला वेगळं वळण title=

ठाणे: शिवसेनेच्या शाखाप्रमुखानं महिला कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पण या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या महिला कॉन्स्टेबलनं पहिले शिवसेना शाखाप्रमुखाला चापटी मारली, त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला आणि मग शाखाप्रमुख शशिकांत कालगुडेनं महिला कॉन्स्टेबलला मारहाण केली. अशी जबानी सीसीटीव्ही ऑपरेटरनं दिली आहे. 

ही सगळ्या घटनेचं फूटेज दोन सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं आहे. पण पोलिसांनी मात्र एकच सीसीटीव्ही फूटेज समोर का आणलं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

25 फेब्रुवारीला हा सगळा प्रकार घडला. कार चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्यानं मी शशिकांत कालगुडेला अडवलं, त्यानंतर त्यानं मला अश्लिल भाषेत शिव्या दिल्या, म्हणून मी त्याला चापटी मारली, असं या महिला कॉन्स्टेबलनं सांगितलं आहे.