उल्हासनगर : महानगरपालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील आसाराम बापूच्या आश्रमाला मालमत्ता करामध्ये ४७ लाख रुपयांची सूट दिल्याचे प्रकरण उजेडात आलंय.
विशेष म्हणजे प्रशासनाने अश्या प्रकारची सूट देणे नियम बाह्य असून २००४-२००५ ची सूट दिली असता लेखा विभागाने त्यावर आक्षेप नोंदवले होते. मात्र आसाराम बापूंच्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्थायी समितीने हा बेकायदेशीर ठराव मंजूर करून उल्हासनगर येथील आश्रमाला भरघोस सूट दिलीय.
याबाबत कायद्याने वागा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी याबाबत महापालिकेस जाब विचारला असून, महाराष्ट्र सरकारकडे हा ठराव विखंडीत करण्यासाठी पाठवा अशी मागणी केली आहे.
बापूंच्या आश्रमाकडून थोडी का होईना कराची रक्कम वसूल झाली याबद्दल समाधानी असून देण्यात आलेली सवलत ही कायद्यात बसत नसल्यास कारवाई करु असं आयुक्तांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.