सख्ख्या भावा-बहिणीनं केला लहान भावाचा खून

वडिलोपार्जित घराच्या वादामधून सख्ख्या भावा-बहिणीनं आपल्या लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

Updated: Jun 30, 2016, 08:34 PM IST
सख्ख्या भावा-बहिणीनं केला लहान भावाचा खून title=

औरंगाबाद : वडिलोपार्जित घराच्या वादामधून सख्ख्या भावा-बहिणीनं आपल्या लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. रमेश मिसाळ असं या तरुणाचं नाव आहे. रमेशचं नुकतंच लग्न झालेलं होतं. सुरवातीला ही आत्महत्या असल्याचं भासवण्यात आलं, पण नंतर मात्र हा खून असल्याचं लक्षात आलं.

रमेशची बायको विजया मिसाळच्या फिर्यादीवरून भाऊ गणेश मिसाळ, बहिण जयश्री सोनटक्के आणि मेव्हणा ओमकार सोनटक्के यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेशचा 16 जूनला रात्री बहिण, मेव्हणा आणि भाऊ यांनी मिळून दोरीनं गळा आवळून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह दुसरीकडे एका खोलीत नेऊन ठेवला आणि मृतदेहाला गळफास लावण्यात आला. 

सुरवातीला ही आत्महत्या असल्याचं दाखवण्यात आलं, पण रमेशच्या पत्नीनं मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आणि 12 व्या दिवशी ही आत्महत्या नसून खून असल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी गणेश आणि ओमकारला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.