प्रणिती शिंदे यांनी बसवलं वॉटर एटीएम आणि फिल्टर

शहरातील गरिब वस्तीत राहणारे लोक गेल्या अनेक वर्षांपासून दुषित पाणी पित होते.

Updated: Jan 27, 2016, 10:11 PM IST
प्रणिती शिंदे यांनी बसवलं वॉटर एटीएम आणि फिल्टर title=

सोलापूर : शहरातील गरिब वस्तीत राहणारे लोक गेल्या अनेक वर्षांपासून दुषित पाणी पित होते. त्यांची व्यथा ऐकून आमदार प्रणिती शिंदे यांनी जय शंकर तालीम मोदी येथे शुद्ध पाण्याचं फिल्टर बसवलं. त्यामुळे बोअरवेलमधून पाणी फिल्टर होऊन शुध्द पाणी पिण्यासाठी नागरिकांना मिळतंय.

परिसरात पाण्याचं ए.टी.एम मशीन बसवलं असून त्यातून प्रत्येक कुटुंबियांना 20 लीटर पिण्याचं शुद्ध पाणी मिळतंय. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळू लागल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय.