अधिवेशनाच्या नावाने शिक्षकांना विशेष रजा नाही : औरंगाबाद खंडपीठ

शाळा बंद करून अधिवेशनाला जाणाऱ्या शिक्षकांना विशेष रजा घेता येणार नाहीत असा निर्णय कोर्टानं दिलाय. 

Updated: Feb 4, 2016, 04:00 PM IST
अधिवेशनाच्या नावाने शिक्षकांना विशेष रजा नाही : औरंगाबाद खंडपीठ title=

औरंगाबाद : शाळा बंद करून अधिवेशनाला जाणाऱ्या शिक्षकांच्या औरंगाबाद खंडपीठानं चाप लावला, अधिवेशनासाठी शिक्षकांना विशेष रजा घेता येणार नाहीत असा निर्णय कोर्टानं दिलाय. त्यामुळं शिक्षकांच्या पगारी रजा रद्द होणार आहेत. 

यासाठी कॅज्युअल रजा घेण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.  पैठणच्या ज्ञानेश्वर कप्पी या शिक्षकानं अधिवेशनासाठी घेतलेल्या विशेष रजेविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. त्यावर कोर्टानं हा निर्णय दिलाय. 

पुण्यात दांडी बहाद्दरांना चाप

महापालिका शिक्षण मंडळाने नोटीसा बजावुनही पुण्यातील शिक्षक अधिवेशनासाठी गेले आहेत. महापालिका शाळांमधील निम्यापेक्षा जास्त शिक्षकांनी पगारी रजा घेतल्याने शाळा ओस पडल्या आहेत शहरातील अशा सुट्टी देण्यात आलेल्या छत्तीस शाळांच्या केंद्र प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. 

पुण्यामध्ये महापालिकेच्या तीनशे अकरा प्रथमिक शाळा असुन त्यामध्ये सुमारे 88 हजार विद्यार्थी शिकतात. महापालिकेंच्या शाळांमधील 2200 शिक्षकांपैकी 1028 शिक्षक सुट्टीवर आहेत. येत्या 5 आणि 6 फेब्रुवारील नवी मुंबईत शिक्षकांचे अधिवेशन होत आहे. त्यासाठी त्यांना सहा दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात आली आहे.

 मात्र सुट्टीवर जातांना शाळेचे कामकाज बाधीत होऊ नये अशा सूचना दिल्य़ा आसतांना शहरातील अनेक शाळा बंद आहेत. शाळा सुरू ठेवण्याचे कुठल्याच प्रकारचे नियोजन न करता शिक्षकांनी शाळा अक्षरश वा-यावर सोडल्या आहेत.