'ताडोबा'त धोक्यात घंटा; १२१ हेक्टर जंगल होणार बेचिराख

देशाचं भूषण आणि चंद्रंपूरची शान असलेल्या जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नवा धोका संभवतो आहे. या व्याघ्र प्रकल्पाला अगदी लागून एका नव्या खुल्या कोळसा खाणीला केंद्रीय वनपर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चंद्रपूरमधला हरीत पट्टा तसंच वन्यजीवांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. 

Updated: Sep 4, 2015, 10:38 AM IST
'ताडोबा'त धोक्यात घंटा; १२१ हेक्टर जंगल होणार बेचिराख title=

चंद्रपूर : देशाचं भूषण आणि चंद्रंपूरची शान असलेल्या जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नवा धोका संभवतो आहे. या व्याघ्र प्रकल्पाला अगदी लागून एका नव्या खुल्या कोळसा खाणीला केंद्रीय वनपर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चंद्रपूरमधला हरीत पट्टा तसंच वन्यजीवांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. 

चंद्रपूर शहरापासून सुमारे २२ किमी अंतरावर जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र, या अंतरात सुमारे अर्धा डझन खुल्या कोळसा खाणी आहेत. इथलं १२१ हेक्टर जंगल बेचिराख करून तिथे दुर्गापूर डीप विस्तार खाणीकरता आता कोळसा उत्खनन केलं जाणार आहे. याबाबत २०१४ साली वनविभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि वन्यजीवप्रेमी चिंताग्रस्त झाले आहेत. 

आधीच इथल्या खाणींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वाघांचे सर्वोत्तम भ्रमणमार्ग उध्वस्त झाले आहेत. यात आता दुर्गापूर डीप विस्तारानं या सर्वांवर कडी केली असून, या खाणीनं वाघोबांचं अस्तित्वच संकटात आणलं आहे, असं पर्यावरण अभ्यासक डॉ. योगेश्वर दुधपचारे यांनी म्हटलंय.

विशेष म्हणजे या नव्या खाण क्षेत्रातील जंगलात वाघ, बिबटे, चितळ, अस्वल, सांबर असं विपुल वन्यजीवन आणि वृक्षसंपदा अस्तित्वात आहे. तरीही ही खाण योग्य असून खाणीनं भ्रमणमार्ग तुटणार नाही असा आश्चर्यजनक निष्कर्ष, वन विभागानं नेमलेल्या तज्ज्ञ समितीनं नोंदवला आहे. वनाधिकारी मात्र यावर वनाधिकारी मात्र सारवासारव करताना दिसतायत.

चंद्रपूर जिल्ह्यात ५० कोळसा खाणी आहेत. त्या सर्व जंगलांना-गावाना उध्वस्त करून खोदल्या गेल्या आहेत. मात्र ताडोबाचा भ्रमणमार्ग शाबूत ठेवण्यासाठी वनविभाग आटोकाट प्रयत्न करत असल्याचं आजवरचे चित्रं होतं. मात्र तेही फसवं असल्याचं दुर्गापूर डीपला दिलेल्या परवानगीनं सिध्द झालं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.