ठाणे हत्याकांड : बहिणीच्या जबाबात धक्कादायक खुलासा, बहिणीवर लैंगिक अत्याचार

हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उघड होत आहे. हसनैन सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.

Updated: Mar 5, 2016, 03:41 PM IST
ठाणे हत्याकांड : बहिणीच्या जबाबात धक्कादायक खुलासा, बहिणीवर लैंगिक अत्याचार title=

ठाणे : कासार वडवली सामूहिक हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उघड होत आहे. हसनैन सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.

हत्याकांडात वाचलेल्या रुबिना या त्याच्या बहिणीनंच हा जबाब दिलाय. हसनैनची एक बहीण गतीमंद होती तिच्यावर तो लैंगिक अत्याचार करत होता. ४ फेब्रुवारीला ही माहिती उघडकीस झाली तेव्हापासून तो अस्वस्थ होता.

वरेकर हत्याकांडात धक्कादायक खुलासा झाल्याने प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. हसनैन सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करायचा ही बाब हल्ल्यातून वाचलेल्या बहिणीने जबाब दिला. पोलिसांना हा जबाब नोंदवून घेतला आहे. ४ फेब्रुवारीला लैंगिक अत्याचाराची माहिती उघड झाली होती. हे त्याचे प्रकरण उघड झाल्यानं हसनैन कमालीचा अस्वस्थ होता, असे तिच्या बहिणीने सांगितलेय.