प्रबळगडावर आढळला बेपत्ता ट्रेकर महिलेचा मृतदेह

पनवेलच्या प्रबलगडावर ट्रेकींगसाठी आलेल्या रचिता कानोडिया या 27 वर्षीय विवाहीतेचा दरीत मृतदेह सापडलाय. रचिता हि तेलंगानातील सिंकदराबाद येथे राहणारी असून तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. 

Updated: Dec 8, 2016, 08:09 AM IST
प्रबळगडावर आढळला बेपत्ता ट्रेकर महिलेचा मृतदेह title=
प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई : पनवेलच्या प्रबलगडावर ट्रेकींगसाठी आलेल्या रचिता कानोडिया या 27 वर्षीय विवाहीतेचा दरीत मृतदेह सापडलाय. रचिता हि तेलंगानातील सिंकदराबाद येथे राहणारी असून तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. 

ट्रेक सुटमध्ये असलेल्या या तरूणीचं नाव आहे रचिता कानोडिया. या विवाहीत तरूणीला ट्रेकिंगचा छंद होता..मात्र पनवेलमधील प्रबलगडचा ट्रेक तिच्या जीवावर बेतला. 25 तारखेला रचिता आपल्या घरातून ट्रेकसाठी निघाली. सकाळी साडे सातच्या दरम्यान ती मुंबईला पोहोचली. तेथून टॅक्सी पकडून तिने थेट प्रबळ गडाचा पायथा गाठला. ट्रेकींगसाठी एकटी आलेल्या तरुणीला ड्रायव्हर सोडून निघून गेला. 

25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान कोणताही संपर्क तिच्या घरच्यांनी आणि सासरच्यांनी केला नाही. मात्र 29 तारखेला तिला फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर तिच्या घरच्यांनी नारायण गोंडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि तेथून तिचा शोध सुरू झाला.

तीन दिवस तेलंगाणा पोलीस निसर्ग मित्र, आदिवासी आणि पनवेल पोलीस स्टेशनचे अधिकारी अश्या 60 जणांनी मिळून तिचा शोध घेतला. या शोध मोहीमेत तिचा मृतदेह एका झुडूपात आढळून आला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह घरच्यांना देण्यात आला. 

मुंबई एअरपोर्टवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामुळे ती कोणत्या टॅक्सीत बसली होती हे समजले. त्या टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिचा शोध घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आता अपघाताची नोंद केली आहे.