तर पीएमपीएल अधिकाऱ्यांना वेतन नाही मिळणार..

पीएमपीएल सुधारण्यासाठी पुण्यात नवा परदेशी पॅटर्न राबवण्यात येणार आहे. पीएमपीएलच्या नादुरूस्त बसेस दुरूस्त करून जोपर्यंत रस्त्यावर धावत नाहीत, तोपर्यंत अधिका-यांना वेतन मिळणार नाही अशी सक्त ताकीद पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांनी दिलीय.

Updated: Jan 1, 2015, 06:08 PM IST
 तर पीएमपीएल अधिकाऱ्यांना वेतन नाही मिळणार.. title=

पुणे : पीएमपीएल सुधारण्यासाठी पुण्यात नवा परदेशी पॅटर्न राबवण्यात येणार आहे. पीएमपीएलच्या नादुरूस्त बसेस दुरूस्त करून जोपर्यंत रस्त्यावर धावत नाहीत, तोपर्यंत अधिका-यांना वेतन मिळणार नाही अशी सक्त ताकीद पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांनी दिलीय.

पीएमपीएलच्या एकूण २१११ बसेस आहेत त्यापैकी केवळ १४२० म्हणजे ६० टक्के बसेस सध्या रस्त्यावर धावत आहेत. हे लक्ष्य ८० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही परदेशींनी सांगितलंय. 

पीएमपीएल ही पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळं तोटा कमी करून पीएमपीएलला जीवदान देण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.