शीळ-डायघर फाटा ३ लेडीज बार, १० लॉज, २० हुक्का पार्लर्स भुईसपाट

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी शीळ फाटा येथून पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरूवात करण्यात आली. या कारवाईमध्ये शुभम लॉज, कोकण किंग, वर्षा लॉज, सागर लॉज, सचिन लॉज, साई विहार लॉज, रोहित लॉज, प्रेम लॉज, हनुमान लॉज हे लॉज तोडण्यात आले. तर ब्रीस्टो ग्रील, लीला बार, रॉक्स स्टार हे लेडीज बार भुईसपाट करण्यात आले. 

Updated: Dec 5, 2016, 07:49 PM IST
शीळ-डायघर फाटा ३ लेडीज बार, १० लॉज, २० हुक्का पार्लर्स भुईसपाट  title=

ठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी शीळ फाटा येथून पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरूवात करण्यात आली. या कारवाईमध्ये शुभम लॉज, कोकण किंग, वर्षा लॉज, सागर लॉज, सचिन लॉज, साई विहार लॉज, रोहित लॉज, प्रेम लॉज, हनुमान लॉज हे लॉज तोडण्यात आले. तर ब्रीस्टो ग्रील, लीला बार, रॉक्स स्टार हे लेडीज बार भुईसपाट करण्यात आले. 

या कारवाईमध्ये वाय जंक्शन ते शीळ फाटा, शीळ फाटा ते कल्याण फाटा या परिसरातील जवळपास २० हुक्का पार्लर्स नेस्तनाभूत करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने भाईजान, मेजबान, शेजवान, मोघल धाबा, फूड टॉक, नवाजा, गुगील्स रेस्टॉरंट, नाईट लाईफ, मोती महल, ग्रीन लॉन, दोस्ती, अंबानीज, आरक्षित भुखंडावरील ग्रीन पार्क, मून लाईट, आर. बी. एन. नाईट, लाईट नाईट, व्हॉटस्प, सुफी धाबा, बायपास धाबा, टकाटक, ब्लू लॉन या हुक्का पार्लर्सचा समावेश आहे. 

दरम्यान, या परिसरातील जवळपास ४०० पेक्षा जास्त गॅरेजेस पूर्णत: तोडण्यात आले. सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष दहा पथकांच्या साहाय्याने केली