उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी-ट्रकची धडक, ६ ठार

उपळाईजवळ एसटी आणि ट्रकच्या भीषण अपघातात ६ जण ठार, तर १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Updated: Jan 9, 2015, 03:08 PM IST
उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी-ट्रकची धडक, ६ ठार title=

उस्मानाबाद : उपळाईजवळ एसटी आणि ट्रकच्या भीषण अपघातात ६ जण ठार, तर १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अहमदनगरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या एसटीचा आणि तुळजापूरहून अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

या अपघातात एसटी आणि ट्रकमधील ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.