धुळ्यात दोघांचा उष्माघाताने बळी

उन्हाळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. आणखी दोघांचा उष्माघातानं बळी गेलाय. 

Updated: May 21, 2016, 07:17 PM IST
धुळ्यात दोघांचा उष्माघाताने बळी  title=
संग्रहित

धुळे : उन्हाळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. आणखी दोघांचा उष्माघातानं बळी गेलाय. 

मिलिंद चित्ते आणि विकास माळी या अशी या दोघांची नावं आहेत. मे महिन्यात आतापर्यंत एकूण सहा जणांना उष्माघातानं आपला जीव गमवावा लागलाय.. यामध्ये शेतकरी, मजूर आणि समारंभासाठी गेलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यात पारा ४४ ते ४६ अंशांपर्यंत पोहचलाय. विशेष म्हणजे या सहा जणांव्यतिरिक्त आणखी काही व्यक्तींना उष्माघातामुळं जीव गमवावा लागलाय.. मात्र सरकार दरबारी त्यांच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशीच आहे. सरकारी आकड्यानुसार जिल्ह्यात उष्माघातानं बळी गेलेल्यांची संख्या तीन आहे.