उद्धव ठाकरेंच्या पिंपरीतील भाषणाचे ठळक मुद्दे

उद्धव ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन सत्ताधारी राष्ट्रवादीला धारेवर धरण्याऐवजी मोदी आणि भाजपलाच टार्गेट केले. त्यांच्या संपूर्ण भाषणात एक दोनवेळा राष्ट्रावादी आणि पवारांचा उल्लेख झाला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 13, 2017, 08:53 PM IST
उद्धव ठाकरेंच्या पिंपरीतील भाषणाचे ठळक मुद्दे  title=

पिंपरी चिंचवड : उद्धव ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन सत्ताधारी राष्ट्रवादीला धारेवर धरण्याऐवजी मोदी आणि भाजपलाच टार्गेट केले. त्यांच्या संपूर्ण भाषणात एक दोनवेळा राष्ट्रावादी आणि पवारांचा उल्लेख झाला. 

 

वाचा उद्धव ठाकरे यांच्या पिंपरी चिंचवडमधील भाषणातील ठळक मुद्दे 

 

कधी ना कधी संयम संपतो, बिन भावनेच्या लोकांशी किती दिवस युती करायची, म्हणून युती तोडली , विधानसभेला मला फसवलं तो अनुभव होता, आणि काळबेरे आहे हे समजले म्हणून युती तोडली

- काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये काही दम नाही, पण भाजप याच पक्षांची आवृत्ती..म्हणून भाजप वर टीका

 - शरद पवार, नरेंद्र मोदी एकाच नाण्याच्या दोन बाजू
 
 निवडणुका जिंकण्यासाठी भाजप अत्यंत खालच्या थराला गेलेत...
 
 अण्णा हजारे यांना पदम आणि ज्या पावरा विरोधात लढा दिला त्याना पडमविभूषण हे यांचे काम
 
 मध्य प्रदेश मध्ये आय एस आय एजंट भाजप मध्ये कसा....
 
 मोहन भागवत यांनि देश प्रेम मोजता येत नाही हे वक्तव्य मोदींच उद्देशून केले
 
 खादी ग्रामोद्योग वर फोटो लावल्याबद्दल ही टीका
 
 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाचा  जन्म झाल्यासासारखा भाजप वाल्यांचा आवेश
 
 पंतप्रधानावर जोरदार टीका, भाजप कडे चेहराच नाही, महापालिका निवडणुकीत पंतप्रधानांचा चेहरा वापरतात मग टीका का करू नये
 
 पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडणुकीचा प्रचार करत आहेत ,त्यावर ही टीका
 
 यांच्या हातात महापालिकेची सत्ता गेली तर रँड सारखे घरात घुसतील, हे काय स्वातंत्र्य आहे - उद्धव ठाकरे
 
 नोट बंदी हा वेडा कारभार...!
 
 मोदी यांनी सर्वसामान्य लोकांच्या खिशात हात घालून मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केला - उद्धव ठाकरे
 
 कल्याण डोंबिवली मध्ये 6500 कोटी देतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एक दमडा दिला नाही, म्हणूनच साहित्य संमेलनातं त्यांना काळे झेंडे दाखवले
 
 27 गावांना वेगळी महापालिका देतो असं खोटे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्यामुळं तिथं भाजपला यश मिळालेय, आता ती गावे बाहेर गेली तर भाजप ची ताकत कमी होईल म्हणून ते आता गाव वाल्यानं भेटत नाहीत
 
 मुख्यमंत्री टपोरी पणा सोडून द्या मुख्यमंत्र्यांना टोला
 
 शिव सेनेच्या हातात सत्त्ता द्या, पिंपरी चिंचवड मधल्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निकाली काढू, आश्वासन पाळलं नाही तर परत शहरात येणार नाही
 
 सर्जिकल स्ट्राईक चे श्रेय घेता, मग जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाचे अन्न मिळते त्याचा ही जबाबदारी घ्या..!
 
 महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा, मी राज्य सरकारला कायम पाठिंबा देतो - उद्धव ठाकरे
 
 मुंबई च्या सत्तेसाठी किती खोटे बोलणार - उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
 
 कितीदा मुंबई च्या खड्यांचे सांगणार, नागपूर मध्ये किती खड्डे आहेत
 
 मुंबईत मते मागताना छत्रपतींचा आशीर्वाद आणि उल्हासनगर मध्ये कालानीचा आशीर्वाद
 
 आमची युती अटलजी च्या भाजप बरोबर होती, त्या भाजपला नीती मत्ता होती, आज भाजप च्या व्यासपीठावर फक्त गुंडच दिसतात...उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका
 
 गुंडांच्या जोरावर आम्हाला आव्हान देणार असाल तर माझे वाघ पाय मोडल्या शिबाय राहणार नाही -
 
 नरेंद्र मोदी जी कुंडल्यांची धमकी देऊ नका, बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला नासता तर कुठल्या कुठे तुमची कुंडली कुठे गेली असते
 
 बाबरी नंतर शिव सेना नसती तर मुंबई राहिली नसती...!