अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हायकोर्टात

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने फर्लोसाठी हायकोर्टात अर्ज

Updated: Aug 20, 2016, 09:47 AM IST
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हायकोर्टात title=

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने फर्लोसाठी हायकोर्टात अर्ज केला आहे. पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी गवळीने ३० दिवसांची फर्लो रजा मागितली आहे. अरुण गवळीच्या फर्लो रजेबाबत न्यायालयाने विभागीय आयुक्त, कारागृह अधीक्षक यांच्याकडे ७ सप्टेंबरपर्यंत उत्तर मागीतलं आहे.

नगरसेवकाच्या खून प्रकरणात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गवळीने नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल करून एक महिन्याच्या पॅरोलची मागणी केली आहे.