पोलीस उपनिरीक्षकाच्या ७१४ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ७१४ जागांवर भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०१३ आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 22, 2013, 04:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ७१४ जागांवर भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०१३ आहे.
७१४ जागांपैकी २१३ जागा महिलांसाठी आहेत, तसंच ३६ जागा खेळाडूंसाठी राखीव आहेत. या पदासाठी वय १ नोव्हेंबर २०१३ पर्यंत किमान १९ वर्षं अपेक्षित आहे. २८ वर्षांवरील वक्ती पात्र ठरणार नाही. या पदांसाठी मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदवीच्या समतुल्य अर्हता असणं आवश्यक आहे.
या पदासाठी पात्र व्यक्तींची उंची किमान १६५ सेमी असणं बंधनकारक आहे. महिलांसाठी किमान उंची १५७ सेमी असणं आवश्यक आहे. या पदासाठी पात्र व्यक्तींना वेतन श्रेणी रु. ९,३०० ते ३४,८०० (ग्रेड पे ४,३००) असेल. अधिक भत्ते मिळून एकूण २१,७५२ रुपयांपर्यंत वित्तलब्धी होईल.
अधिक माहिती www.mahaonline.gov.in तसंच www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.