सर्पमित्राला कोब्रा जातीचा साप चावला

एकीकडे ज्यानं आजपर्यत अनेक सापांना जीवदान दिलं. त्याचं सापानं त्याचा जीव घेतलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 1, 2017, 06:59 PM IST
सर्पमित्राला कोब्रा जातीचा साप चावला title=

वसई : वसईत साप पकडणं एका सर्पमित्राच्या जीवावर बेतलं. नायगाव परिसरात राहणाऱ्या सर्पमित्राला कोब्रा जातीचा साप चावला आणि त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तो साप पकडण्यात सराईत होता. 

एकीकडे ज्यानं आजपर्यत अनेक सापांना जीवदान दिलं. त्याचं सापानं त्याचा जीव घेतलाय. या घटनेमुळे मिस्त्री कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला. तर साप पकडण्यासाठी कोणतीच घाईगडबड करू नका असा सल्ला सर्प मित्रांनी दिला आहे. 

साप जेवढा शांत असतो तेवढाच आक्रमकही असतो. त्यामुळे साप पकडण्यासाठी दक्षता घेतली आहे.