स्वतंत्र विदर्भाला भाजपाचा पाठिंबा

स्वतंत्र विदर्भाव बोलण्यास आता भाजप नेत्यांनी सुरूवात केली आहे. छोटी राज्ये असावीत ही भाजपाची भूमिका असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत पक्ष ठाम आहे. मात्र स्वतंत्र मराठवाड्याचा कोणताही विचार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी स्पष्ट केले. 

Updated: Apr 3, 2016, 03:11 PM IST
स्वतंत्र विदर्भाला भाजपाचा पाठिंबा title=

नाशिक : स्वतंत्र विदर्भाव बोलण्यास आता भाजप नेत्यांनी सुरूवात केली आहे. छोटी राज्ये असावीत ही भाजपाची भूमिका असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत पक्ष ठाम आहे. मात्र स्वतंत्र मराठवाड्याचा कोणताही विचार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी स्पष्ट केले. 

तसेच छोटी राज्ये निर्माण करण्यामागे कॉँग्रेसप्रमाणे राजकारण हा हेतू नही, तर प्रशासकीय सोय हाच मुद्दा असल्याचा दावाही रावसाहेब दाववे यांनी केला.

नाशिकमध्ये शनिवारी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक, तर रविवारी विस्तृत कार्य समितीची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.