ठाण्यातल्या तरूणीने चालत्या रिक्षातून उडी मारली

महिलांवरच्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होतेय. ठाण्यातल्या एका रिक्षाचालकाने एका २४ वर्षांच्या तरुणीला भलतीकडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणीनं चालत्या रिक्षातून उडी मारून स्वत:चा बचाव केला. पण तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. ती कोमात गेलीय. 

Updated: Aug 5, 2014, 07:57 PM IST
ठाण्यातल्या तरूणीने चालत्या रिक्षातून उडी मारली title=

ठाणे : महिलांवरच्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होतेय. ठाण्यातल्या एका रिक्षाचालकाने एका २४ वर्षांच्या तरुणीला भलतीकडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणीनं चालत्या रिक्षातून उडी मारून स्वत:चा बचाव केला. पण तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. ती कोमात गेलीय. 

ठाण्यातल्या कोलशेतमध्ये राहणारी २४ वर्षांची स्वप्नाली लाड ही शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी जात होती. त्यावेळी तिनं कापुरबावडीमधून रिक्षा पकडली. रिक्षावाला अतिशय वेगात रिक्षा चालवत होता. तिला जायचं त्या दिशेनं रिक्षा न नेता कळेरच्या दिशेनं तो जायला जागला.

तिच्या लक्षात येताच तिनं आरडओरडा केला. मात्र, रिक्षावाल्यानं रिक्षा थांबवली नाही. त्यामुळे अखेर तिनं धावत्या रिक्षातून उडी मारली. यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखत झालीय. रस्त्याच्या कडेला तरुणी पडल्याचं समजताच नगरसेविका उषा भोइर यांनी तिला जवळच्या एका रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

या प्रकरणी कापुरबावडी पोलीस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस त्या रिक्षाचालकाचा शोध घेतायत. या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई होण्याची मागणी स्वप्नालीच्या कुटुंबीयांनी केलीय. ज्या प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पहिला असेल, त्यांनी पुढे येऊन या घटनेचीची माहिती पोलिसांना द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.