'अमेरिकेत जाऊन ट्रम्पचं अभिनंदन करणार'

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.

Updated: Nov 11, 2016, 02:03 PM IST
'अमेरिकेत जाऊन ट्रम्पचं अभिनंदन करणार' title=

कोल्हापूर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे. आरपीयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी या निवडीनंतर ट्रम्प यांचं कौतुक केलं आहे.

अमेरिकेत जाऊन आपण डोनाल्ड ट्रम्पना भेटणार आहोत आणि त्यांचं अभिनंदन करणार आहोत, असंही रामदास आठवले म्हणाले. अमेरिकेतला रिपब्लिकन पक्षानं श्रमिक आणि कष्टकरी वर्गाचं प्रतिनिधीत्व करतो तसाच भारतातला रिपब्लिकन पक्षही याच वर्गाचं प्रतिनिधीत्व करत असल्याचंही आठवले म्हणाले.