बनावट कागदपत्राच्या आधारे महिलेचा नोकरीचा प्रयत्न

नांदेड येथील २४ वर्षीय विवाहितेने राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या बनावट सहीचा वापर करून 'यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी'मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकाराचा भांडफोड झाला. 

Updated: Jul 23, 2014, 05:48 PM IST
बनावट कागदपत्राच्या आधारे महिलेचा नोकरीचा प्रयत्न title=

पुणे : नांदेड येथील २४ वर्षीय विवाहितेने राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या बनावट सहीचा वापर करून 'यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी'मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकाराचा भांडफोड झाला. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) निवडल्या जाणाऱ्या जिल्हा उपनिबंधक पदावर निवड झाल्याची बनावट कागदपत्रे सादर करून या महिलेने थेट राज्य प्रशासनात नोकरी मिळवण्याचा व त्याकरिता आवश्यक असलेले प्रशिक्षण घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी'मध्ये कार्यरत असलेले योगेश भोसले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विद्या रमेश धुमाळ-पाटील आणि शिवराज मधुकर पाटील हे दाम्पत्य मुळचे नांदेड येथील आहेत. ​विद्या पाटील या मंगळवारी सकाळी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी तेथे ग्रामविकास व जलसंधारण बांधकाम भवन येथून उपनिबंधकपदी नियुक्ती झाल्याचे पत्र दाखवले. या पत्रावर अधिकारी रवींद्र पाटील तसेच राज्यपाल के. शंकरनारायणन यांची सही होती.

उपनिबंधकाची नियुक्ती ही थेट ग्रामविकास व जलसंधारण बांधकाम भवन येथून झाल्याने येथील अधिकाऱ्यांना शंका आली. नंतर विद्या पाटील हिच्याकडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागल्यामुळे लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्राथमिक चौकशीत पाटील हिने दाखवलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी विद्यासह तिच्या पतीला अटक केली असून, कोर्टाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.