महिलेला विवस्त्र होऊन द्यावी लागते येथे अग्निपरीक्षा

काशीकापडी आणि गोंधळी समाजातील जातपंचायतीचा जाच झी मिडीयाने उघडकीस आल्यानंतर कंजारभाट समाजातील अनिष्ट रुढी परंपरा विरोधात छाया सतीश तमाचेकर या विधवा महिलेन एल्गार पुकारलाय.

Updated: Jan 3, 2019, 01:21 PM IST
महिलेला विवस्त्र होऊन द्यावी लागते येथे अग्निपरीक्षा title=

नाशिक : काशीकापडी आणि गोंधळी समाजातील जातपंचायतीचा जाच झी मिडीयाने उघडकीस आल्यानंतर कंजारभाट समाजातील अनिष्ट रुढी परंपरा विरोधात छाया सतीश तमाचेकर या विधवा महिलेन एल्गार पुकारलाय.

पतीच्या मृत्यूनंतर या महिलेचे नात्यातीलच एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून तिची बदनामी केली. या पापातून मुक्त होण्यासाठी तिला अनिष्ट शिक्षेला समोर जाणायचा आग्रह धरण्यात आला.

कंजारभाट समाजात महिलेला आपलं निर्दोषत्व सिद्ध ककरण्यासाठी तिला सर्वासमोर निर्वस्त्र करून अंग झाकण्यासाठी छोटासा कापडाचाशुभ्र पांढरा रंगाचा पातळ तुकडा दिला जातो. कलंकित महिलेला १०७ पावलं चालायला लावतात. त्याच वेळी अर्धा अर्धा किलो गव्हाच्या पीठाचे गरम गोळे मारून फेकले जातात. त्याच बरोबर रुईच्या झाडाच्या आगीत गरम केलेल्या काठीने मारले जाते. त्यानंतर तिला अंगावर दूध टाकून नदीत स्नानासाठी पाठवले जाते.

एवढच नाही तर आईचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तिच्या चिमुकल्या मुलालाही परीक्षेला सामोरे जावे लागते. रात्रभर तीनशे गौरया जळून गरम केलेली तीन किलोची कुऱ्हाड पूर्णपणे लाल होई पर्यंत तापविली जाते आणि सकाळी सात वाजता रुईची पाच पान ठेवून मुलाच्या हातावर ठेवले जाते. त्याच्या हाताला चटके बसून फोड आले तर ती महिला कलंकित आहे असल्याचा ठपका ठेवला जातो.

विशेष म्हणजे या दोघा मायलेकांची ही परीक्षा येत्या गुढी पाडव्याच्या दिवशी घेतली जाणार होती मात्र त्या आधीच गुप्त पंचायत बसवून ज्या तरुणावर अनैतिक संबंधाचे आरोप केलेत त्या तरुणालाही याच शिक्षेला समोर जावं लागलं असून पंचांच्या भीतीने तो काही बोलत नसल्याचा दावा महिलेने केलाय.