ट्रॅक्टरनं दुचाकीस्वारांना धडक दिल्यानं ७ जणांचा मृत्यू

ट्रॅक्टरनं दुचाकीस्वारांना धडक दिल्यानं अपघातात ७ जण ठार

Updated: Apr 20, 2016, 06:05 PM IST
ट्रॅक्टरनं दुचाकीस्वारांना धडक दिल्यानं ७ जणांचा मृत्यू title=

यवतमाळ : पुसद येथे भरधाव ट्रॅक्टरनं दुचाकीस्वारांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात ७ जण ठार झाले आहेत. पुसद उमरखेड मार्गावरच्या साई मंदिर जवळ हा भीषण अपघात झाला. दोन मोटरसायकलींवरून पाच जण जात होते. त्यांना मागून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरनं जोरदार धडक दिली. त्यात मोटरसायकलींवरचे ५ तरुण जागीच ठार झाले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर पुसद उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांच्याही मृत्यू झाला आहे. पावलेले सर्व जण पुसद जवळच्या हर्षी आणि मारवाडी गावचे रहिवासी आहेत.