अपहृत सुहासिनी लोखंडेंचा मुलगा परीक्षेला

ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचा मुलगा संकेत लोखंडे याने पोलिसांच्या सुरक्षेत आज दहावीचा पेपर दिला आहे. आज ठाणे महापौर पदाची निवडणूक होणार असून त्यात संख्याबळ सिद्ध करण्यासाठी सुहासिनी लोखंडे यांचा पाठिंबा युतीला मिळणे गरजेचे आहे.

Updated: Mar 6, 2012, 01:11 PM IST

www.24taas.com, ठाणे

ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचा मुलगा संकेत लोखंडे याने पोलिसांच्या सुरक्षेत आज दहावीचा पेपर दिला आहे. आज ठाणे महापौर पदाची निवडणूक होणार असून त्यात संख्याबळ सिद्ध करण्यासाठी सुहासिनी लोखंडे यांचा पाठिंबा युतीला मिळणे गरजेचे आहे.

मुलाला विचारून सुहासिनी लोखंडेंबाबत कळविण्याचे कोर्टाने आदेश दिले आहे. त्यामुळे पेपर संपल्यावर सुहासिनी लोखंडे यांचा मुलगा संकेत याची पोलीस चौकशी करणार असून त्याची आई कुठे आहे त्याबद्दल विचारणा केली जाण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत कोर्टाला ही माहिती देण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहे.

भाजपच्या ठाण्याच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना काल भाजपनं व्हीप बजावला होता. महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश बजावण्यात आला. ठाणे महापालिकेतले गटनेते संजय वागुले यांनी हा व्हिप बजावलाय. सुहासिनी लोखंडे यांच्या घराच्या दारावर व्हिपची नोटीस चिकटवण्यात आली होती. सुहासिनी लोखंडे भाजपच्या नगरसेविका आहेत. त्या गेल्या 24 तारखेपासून बेपत्ता आहेत.