ओकवूड हॉटेलचा पोलीस परवाना रद्द

मुंबईत जुहू इथल्या रेव्ह पार्टी प्रकरणी ओकवूड हॉटेलचा पोलीस परवाना रद्द करण्यात आलाय. पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Updated: May 23, 2012, 01:28 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत जुहू इथल्या रेव्ह पार्टी प्रकरणी ओकवूड हॉटेलचा पोलीस परवाना रद्द करण्यात आलाय. पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

 

पार्टी आयोजित करण्यापूर्वी परवानगी घेण्यात आली नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळं हॉटेलचा पोलीस परवाना रद्द करण्यात आलाय. ह़ॉटेलमध्ये दारू पिवून धिंगाणा घालणा-या तरुण-तरुणींवर कारवाई होणार असल्याचं दिघावकर यांनी स्पष्ट केलंय. रेव्ह पार्टीवर छापा टाकत पोलिसांनी 100 पेक्षा जास्त मुला मुलीना ताब्यात घेतलं होतं. या पार्टीत अनेक विदेशी मुलींचाही समावेश होता. पार्टीतल्या नशेबाजांकडून 110 ग्रॅंम कोकेन, मॅंड्रेक्स, एमडीएमए आणि चरसही जप्त करण्यात आलंय.

 

हॉटेलचा डायरेक्टर विषय हांडा याला यापूर्वीच पोलिसांनी अटक केलीये. रेव्ह पार्टीत आयपीएलपासून बॉलीवुडपर्यतचे अनेक नामांकित चेहरे सहभागी झाल्याचं समोर आलंय. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवण्यास सुरूवात केलीये.