जोशी सरांचा पत्ता कट, अनिल देसाईंना राज्यसभेला उमेदवारी

शिवसेनेकडून अनिल देसाई यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. महापालिका निवडणुकीत दादरमधल्या पराभवाने मनोहर जोशींचा पत्ता कट करण्यात झालाय. दादरमध्ये सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळं पक्षनेतृत्व नाराज असल्याची असल्याची चर्चा होती.

Updated: Mar 15, 2012, 10:57 PM IST

www.24taas.com, मुंबई 

शिवसेनेकडून अनिल देसाई यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. महापालिका निवडणुकीत दादरमधल्या पराभवाने मनोहर जोशींचा पत्ता कट करण्यात झालाय. दादरमध्ये सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळं पक्षनेतृत्व नाराज असल्याची असल्याची चर्चा होती.

जोशींना उमेदवारी नाकारली जाईल असा अंदाज बांधला जात होता. तो खरा ठरला. मनोहर जोशींना उमेदवारी नाकारल्याची बातमी सगळ्यात पहिल्यांदा झी 24 तासवर दाखवण्यात आली. जोशीं बरोबर महायुतीत सामील असलेल्या रामदास आठवले यांचाही विचार करण्यात आलेला नाही.

आठवलेंना राज्यसभेची संधी मिळेल अशी शक्यता होती पण शिवसेना नेतृत्वानं सचिव अनिल देसाई यांना उमेदवारी दिलीय. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून कार्यरत असलेले देसाई शिवसेनेचे सचिन आहेत.