नगरसेवक होणार 'मालामाल'

मुंबई महापालिकेचे नगरसेवक मालामाल होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला आता महिन्याला २५ हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. सोबतच लॅपटॉप आणि एण्ड्रॉइड फोनचीही सुविधा आता नगरसेवकांना महापालिकेकडूनच मिळणार आहे.

Updated: Aug 1, 2012, 07:06 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिकेचे नगरसेवक मालामाल होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला आता महिन्याला २५ हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. सोबतच लॅपटॉप आणि एण्ड्रॉइड फोनचीही सुविधा आता नगरसेवकांना महापालिकेकडूनच मिळणार आहे. पालिका सभागृह आणि स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. नगरसेवकांना विकासकामांसाठी ४० लाखांचा प्रभाग निधी तर ६० लाखांचा नगरसेवक निधी असे १ कोटी रुपयेही मिळणारेत. मनसेनं एण्ड्रॉइड फोनला विरोध केलाय.

 

सध्या नगरसेवकांचं मानधन आहे दहा हजार रुपये मासिक मानधन मिळतं. पण, 10 हजार रुपये वाढत्या महागाईत पुरत नाहीत त्यामुळे मानधन 25 हजार रुपये मिळावं अशा ठरावाची सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मांडली होती. या ठरावातील सूचना महापालिका सभागृहाने संमत केल्यात. आता महापालिका आयुक्तांनी या मागणीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल.

 

सुरुवातीला या ठरावात नगरसेवकांना 50 हजार रुपये मानधन मिळावं असा उल्लेख करण्यात आला होता. पण हा मुद्रणदोष असून 25 हजार रुपये मानधनाची मागणी नगरसेवकांची असल्याचं स्पष्टीकरण शेवाळे यांनी दिलं होतं.

 

.