'पेडर रोड उड्डाणपुलात' आता राज यांची उडी

पेडर रोडवरील रखडलेला फ्लायओव्हर लोकांच्या हिताचा असेल तर तो झालाच पाहिजे. अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलीय. मुंबईत इतर ५५ फ्लायओव्हर्स झाले तेव्हा लोकांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

Updated: Dec 6, 2011, 04:07 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

पेडर रोडवरील रखडलेला फ्लायओव्हर लोकांच्या हिताचा असेल तर तो झालाच पाहिजे. अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलीय. मुंबईत इतर ५५ फ्लायओव्हर्स झाले तेव्हा लोकांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

याप्रकरणी मनसेचे शिष्टमंडळ बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहे. पेडर रोडवरच्या फ्लायओव्हरला लता मंगेशकर कुटुंबियांचा विरोध आहे. त्यामुळं त्यांचं मन राखण्यासाठी सरकार याप्रकरणी ठाम भूमिका घेत नाहीय, असा आरोप करण्यात येतोय. गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या फ्लायओव्हरचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. या परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी हा फ्लायओव्हर होणं गरजेचा आहे.

काही महिन्यांपूर्वीच पेडर रोड येथे फ्लायओव्हरवरून वाद झाला होता. पेडर रोड येथील अतिश्रीमंत वर्ग फ्लायओव्हरला विरोध करत आहे. त्यंच्या मते हा फ्लायओव्हर आपल्या घराच्या अगदी जवळून जाणार असल्यामुळे एखादा अपघात झाल्यास वाहनं थेट घरातच घुसतील अशी भीती व्यक्त केली होती. मात्र, वाहतुकीच्या समस्येचा विचार केल्यास हा फ्लायओव्हर बांधणं गरजेचं असल्याचं मत सर्वसामान्य मुंबईकरांचं आहे.