Arjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video

Arjun Tendulkar, MI Vs LSG IPL 2024 :  बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने बॉलिंग करताना थेट मार्कस स्टॉयनिसशी (Marcus Stoinis) पंगा घेतला. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 17, 2024, 08:42 PM IST
Arjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video title=
Arjun Tendulkar vs Marcus Stoinis

Arjun Tendulkar vs Marcus Stoinis : मुंबई आणि लखनऊ या दोन्ही संघांचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलंय. मात्र, दोन्ही संघ सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ अखेरचा सामना खेळत आहेत. आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी दिली गेली आहे. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलीये. तिलक वर्मा दुखापतग्रस्त आहे आणि डेव्हॉल्ड ब्रेव्हिसला संधी दिली आहे. बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मात्र, स्टॉयनिस अन् अर्जुन यांच्यात वादंग पेटल्याचं दिसून आलं. (Arjun Tendulkar Shows Aggression On Marcus Stoinis)

झालं असेल की, हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. नुवान तुषाराने देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या चेंडूवर बाद केलं अन् मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. त्याचवेळी हार्दिक पांड्या दुसऱ्या एन्डवरून युवा अर्जुनला बॉलिंगला पाठवलं. अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या ओव्हरमध्ये मार्कस स्टॉयनिसच्या बॅटचं तोंड बंद ठेवलं. अर्जुनच्या शेवटच्या चेंडूवर स्टॉयनिसने सरळ शॉट खेळला. त्यावेळी अर्जुनने बॉल उचलला अन् स्टॉयनिसच्या दिशेने उगारला, त्यावेळी स्टॉयनिस देखील थक्क झाला.

अर्जुनने स्टॉयनिसच्या दिशेने बॉल फेकण्याची अॅक्शन केल्यानंतर स्टॉयनिस देखील हसत हसत नको, असं म्हणताना दिसतोय. अर्जुनचं अँग्रेशन पाहून मुंबईचे खेळाडू देखील थक्क झाले.

पाहा Video

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.