मंत्रालयात नागरिकांना बंदी, कारभार सुरू

मंत्रालयातून आजपासून कामकाजाला सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात कामकाजाला सुरूवात केली.

Updated: Jun 25, 2012, 02:30 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मंत्रालयातून आजपासून कामकाजाला सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात कामकाजाला सुरूवात केली.

 

ग्रामविकास सचिव एस एस संधू यांच्या कार्यालयातून उपमुख्यमंत्र्यांनी कामकाजाला सुरूवात केलीय. मंत्रालयात पुढचे सात दिवस सर्वसामान्य जनतेला प्रवेश मिळणार नाही.

 

इमारतींचे फायर ऑडिट 

आगीनंतर पहिल्यांदाच मंत्रालयात कामकाज सरू झालंय. तसंच पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठकही झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर माहिती दिली. नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सर्व शासकीय इमारतींचे फायर ऑडिट होणार आहे.

 

तसंच ज्या इमारतींचे ऑडिट झाले आहे. त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आगीमध्ये मंत्रालयातले 2 हजारपैकी 90 टक्के कॉम्प्युटर्स जळाल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. तर कामकासाठी 4 ठिकाणी पर्यायी जागा मिळाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

 

मृतांना श्रद्धांजली 

अग्निकांडानंतर आज मंत्रालय पुन्हा गजबजले. साठ ते 65 टक्के कर्मचा-यांची मंत्रालयात असतील. बाकीच्या कर्मचा-यांची इतर ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. कामकाज सुरु करण्यापुर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि कर्मचा-यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

मंत्रालयाला लागलेल्या आगीत पाच जणांचा बळी गेला. मृतांच्या नातेवाईकांना मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर सानुग्रह अनुदानाची घोषणा केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तळमजला, पहिला, दुसरा आणि तिस-या मजल्यावर कामकाज सुरू झालंय. जनतेत विश्वास निर्माण व्हावा यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेही मंत्रालयातूनच काम पाहणार आहेत.