मुंबईकरांची म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा संपली

मुंबईकरांची म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आता संपली आहे. ३ मेला म्हाडाच्या घरांची जाहीरात निघणार आहे. तर १९ मेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून ३१ मेला घरांची लॉटरी निघेल.

Updated: May 1, 2012, 10:24 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईकरांची म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आता संपली आहे. ३ मेला म्हाडाच्या घरांची जाहीरात निघणार आहे. तर १९ मेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून ३१ मेला घरांची लॉटरी निघेल.

 

सर्वसामान्य मुंबईकरांबरोबरच गिरणी कामगारांसाठीही २४ मेला लॉटरी निघणार आहे. सर्वसामान्यांसाठी मुंबई ७८७ तर मिरारोडमध्ये १७२६ घरे असणार आहेत. कोकणसाठीही एकत्रित लॉटरी असणार आहे. सर्वात स्वस्त घर मिरारोडमध्ये असणार आहे. २२५ चौरस फूट फ्लॅटची किंमत ८ लाख ८८ हजार रुपये असणार आहे.

 

मुंबईकरांची घरांची प्रतीक्षा संपली

 

- ३ मे रोजी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची जाहीरात येणार

- १९  मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत 

- ३१ मे रोजी होणार घरांची सोडत

- २४ मे रोजी गिरणी कामगारांसाठींच्या घरांसाठीची सोडत

- मुंबईत सर्वसामान्यांसाठी ७८७ तर मिररोडमध्ये १७२६ घरे

- सर्वात स्वस्त घर मिरारोडमध्ये. २२५ चौरस फूट फ्लॅटची किंमत ८ लाख ८८ हजार रुपये