आजपासून 2641 घरांसाठी म्हाडाची नोंदणी सुरू

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 15:22

म्हाडाच्या मुंबई आणि विरारमधील 2641 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरु होतेय. दुपारी 2 वाजल्यापासून ही नोंदणी सुरु होणार आहे. या नोंदणीनंतरच पुढे घरासाठी अर्ज करता येणार आहे. 15 एप्रिल ते 15 मे संध्याकाळी सहापर्यंत ही नोंदणी इच्छुकांना करता येणार आहे. त्यानंतर 24 एप्रिलपासून अर्ज विक्री करण्यात येईल. 24 एप्रिल ते 16 मेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

म्हाडाचं घरं... अन् हेलपाटे घालून मर!

Last Updated: Sunday, March 02, 2014, 13:35

म्हाडानं घरांसाठी नवीन जाहिरात दिलीय. पण, म्हाडाचं घर घेणं म्हणजे काय दिव्य असतं, ते अनुभवायचं असेल तर मालाड मालवणी भागातील म्हाडा कॉलनीला भेट द्यायलाच हवी.

म्हाडाची २०१४ घरे, जाहिरात प्रसिद्ध

Last Updated: Friday, February 28, 2014, 15:05

म्हाडानं २०१४ साठी घरांची जाहिरात प्रसिद्ध झालीय. २६४१ घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय. मुंबई आणि कोकण मंडळाच्या विविध घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय.. यंदा म्हाडाच्या घरांच्या किंमती १२ लाखांपासून ८१ लाखांपर्यंत असणार आहेत.

पाहा, म्हाडाची ही घरं तुमच्यासाठी आहेत?

Last Updated: Friday, February 21, 2014, 09:47

म्हाडानं यंदा आपल्या घरांच्या किंमतीत रेकॉर्ड करण्याचं ठरवलेलं दिसतंय. येत्या दोन दिवसांत म्हडाच्या तब्बल ८७८ घरांसाठी लॉटरी जाहीर होणार आहे.

`महायुती`च्या पाच पांडवांत शकुनीमामा?

Last Updated: Saturday, February 15, 2014, 18:09

पाच पांडव म्हणून एकत्र आलेल्या महायुतीमध्ये सध्या फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... याला कारण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचं.

एक्सक्लुझिव्ह : म्हाडाच्या तयार इमारती गर्दुल्यांसाठी?

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 19:23

म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वर्षानुवर्षे नरकयातना भोगणाऱ्या रहिवाशांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम म्हाडा करतंय. गेल्या आठ वर्षांपासून सायनच्या प्रतिक्षानगरात ट्रान्झिट कॅम्पची बिल्डिंग बांधून तयार आहे. परंतु करोडो रूपये खर्च करून बांधलेली ही इमारत ओस पडून आहे.

...असे आहेत म्हाडाचे नवे ‘उत्पन्न गट’

Last Updated: Thursday, October 24, 2013, 22:53

म्हाडाने लॉटरीसाठीच्या उत्पन गटाच्या निकषांमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहे. या नवीन बदलांमुळे लॉटरी विजेत्यांना कर्ज मिळणे सहज शक्य होणार असल्याचा दावा म्हाडाने केलाय.

`झी मीडिया`चा दणका : `ट्रान्झिट कॅम्प`च्या छळछावण्यांमधून सुटका

Last Updated: Wednesday, October 02, 2013, 13:20

मुंबईतील म्हाडाच्या ट्रान्झिट कँपमध्ये गेल्या २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरुपी घर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी ही माहिती दिलीय.

झी मीडियाचा दणका: ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना मिळाला न्याय

Last Updated: Tuesday, October 01, 2013, 17:44

म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधले रहिवासी अक्षरशः नरकयातना भोगत होते. जिथं दहा मिनिटं उभं राहिलं तरी जीव गुदमरतो तिथं गेली अनेक वर्षं दोनशे कुटुंब कसेबसे दिवस काढत आहेत. झी मीडियानं हाच मुद्दा लावून धरला आणि अखेर इथल्या रहिवाशांना न्याय मिळाला.

म्हाडा आता `सर्वसामान्यांसाठी` उरलं नाही!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 10:15

म्हाडाच्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहचल्या आहेत. त्यातच घरांच्या किंमती कमी करण्याचं सोडून आता म्हाडानं उत्पन्न गटाच्या मर्यादेत बदल करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय.

म्हाडाची खुशखबर; आता मिळणार ३५६ फुटांचं घर!

Last Updated: Tuesday, September 03, 2013, 09:18

सध्या म्हाडाच्या १६० फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना म्हाडानं खुशखबर दिलीय. वसाहतींच्या पुनर्विकासात सध्या १६० फुटांच्या घराच्या ऐवजी ३५६ फुटांचं घर मिळणार आहे.

`हाय क्लास` सोसायट्यांतही दाखल होणार मध्यमवर्गीय!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 10:50

बिल्डरांचा हा ‘हम करे सो...’ रोखण्यासाठी यापुढे २० टक्के फ्लॅट मध्यमवर्गासाठी बांधणं बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.

आता म्हाडाची घरंही द्या अधिकृतरित्या भाड्यानं!

Last Updated: Wednesday, August 07, 2013, 09:40

म्हाडाच्या नव्या निर्णयानं म्हाडाच्या घरात राहणाऱ्या भाडेकरुंना दिलासा मिळालाय. म्हाडाची घरं आता भाड्यानं देता येणार आहेत. मात्र, त्यासाठी म्हाडाची पूर्वपरवानगी असणं आवश्यक असणार आहे.

म्हाडाच्या घरांची लॉटरी झाली सुरू...

Last Updated: Friday, May 31, 2013, 13:43

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १२४४ घरांच्या लॉटरीचा निकाल आज लागला आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येतो आहे

म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसामान्यांची पाठ

Last Updated: Thursday, May 09, 2013, 13:31

सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे अशी जाहिरात करणा-या म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसमान्य पाठ फिरवत आहेत. गेल्या पाच लॉटरीतील अर्ज करणा-यांची संख्या बघितली तर दरवर्षी ती कमी होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

म्हाडा ऑनलाईन अर्जासाठी इथं क्लिक करा

Last Updated: Sunday, April 28, 2013, 08:11

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर म्हाडाची १२५९ घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. १ मे पासून म्हाडांच्या घरासाठीचे अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

प्रतिक्षा संपली, म्हाडाची घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध

Last Updated: Saturday, April 27, 2013, 11:55

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर म्हाडाची १२५९ घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. १ मे पासून म्हाडांच्या घरासाठीचे अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

म्हाडाच्या जाहिरातीची करावी लागणार प्रतीक्षा

Last Updated: Friday, April 26, 2013, 15:28

म्हाडाच्या घरांची जाहिरातीची प्रतीक्षा आणखीन लांबलीये. म्हाडाच्या जाहीरातीचा मुहूर्त लांबणीवर पडलाय. या घरांसाठी 25 एप्रिलचा दिवस निश्चित करण्यात आला होता.

म्हाडाच्या नवीन घरांसाठी जाहिरात

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 23:26

मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या १२६०हून अधिक घरांसाठी उद्या जाहिरात निघणार आहे. १ मेपासून या घरांसाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणार आहे. तर सहा मेपासून अनामत रक्कम भरण्यासाठी नेट बँकिंग सुविधा असणार आहे. २१ मे ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. ३१ मे रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे.

म्हाडाचे घर झाले विक्रमी महागडे!

Last Updated: Monday, April 22, 2013, 20:01

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या किंमती अखेर ठरल्यायत. यावेळी म्हाडानं घरांच्या किमतीचे सगळे रेकॉर्डस मोडलेत. या घरांच्य किमतीनं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच पांढरे होणार आहेत.

गुड न्यूज : म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर

Last Updated: Friday, April 05, 2013, 08:32

मुंबईकरांसाठी म्हाडानं पुन्हा एकदा खूशखबर दिलीय. येत्या ३१ मे रोजी म्हाडाची लॉरी काढण्यात येणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 21:19

दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.

म्हाडा आता ठाण्यातही घरे बांधणार....

Last Updated: Wednesday, February 06, 2013, 13:24

मुंबई आणि उपनगरात स्वतःच हक्काचं घर नसणाऱ्यांसाठी खूष खबर. म्हाडा आता गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी ठाणे आणि कळव्यात घरं बाधणार आहे.

नववर्षात म्हाडाची ४ हजार घरे!

Last Updated: Tuesday, January 01, 2013, 19:25

म्हाडाने २०१३ च्या सोडतीची तयारी सुरू केली असून सोडतीत किती घरांचा समावेश होईल याचा आजच्या म्हाडाच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

म्हाडाचे ४० टक्के अर्जदार अपात्र

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 12:35

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीविजेत्यांसाठी थोडीशी वाईट बातमी. मे २०१२मध्ये मीरा रोडमधील म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागलेले ४० टक्के अर्जदार अपात्र ठरलेत.

म्हाडाची घरे कोणी लाटली?

Last Updated: Tuesday, November 06, 2012, 18:24

बनावट कागदपत्रे, शिक्के, प्रमाणपत्रे तयार करून म्हाडाच्या लॉटरी योजनेअंतर्गत फ्लॅटस् मिळवून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणार्यालला मुंबई क्राइम ब्रँच युनिट-१२ च्या पथकाने अटक केली.

म्हाडाचं घरं हवयं ना, तर आता जास्त पैसे भरा

Last Updated: Saturday, October 13, 2012, 13:12

मुंबईत आपलं स्वत:च घर असावं अशी सामान्य माणासाची इच्छा असते. आणि त्यासाठीच म्हाडाने पुढाकार घेतला.

शिवसेना आज `म्हाडा`वर करणार हल्लाबोल...

Last Updated: Monday, October 08, 2012, 12:48

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासामध्ये हाऊसिंग स्टॉकची सक्ती मागे घेण्यासाठी शिवसेनेने आज म्हाडा कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलंय.

`म्हाडा`च्या कार्यालयात शिवसेनेचा राडा

Last Updated: Monday, September 10, 2012, 15:55

म्हाडाच्या कार्यालयात शिवसैनिकांनी गोंधळ घातला. 100 ते सव्वाशे शिवसैनिक म्हाडाच्या कार्यालयात घुसले होते. म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाची मागणी करत, झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवकही सहभागी झाले होते.

`म्हाडा`ची मास्टर लिस्ट नोव्हेंबरमध्ये

Last Updated: Monday, September 03, 2012, 08:55

धोकादायक इमारतींमधून सुरक्षिततेसाठी किंवा ढासळलेल्या इमारतींतून संक्रमण शिबिरात स्थलांतरित केलेल्या रहिवाशांपैकी हजारो रहिवासी २५-३० वर्षं संक्रमण शिबिरात राहत आहेत. या लोकांना त्यांचं हक्काचं घर देण्यासाठी गेली काही वर्षं मास्टर लिस्ट तयार केली जात आहे.

कायदा हद्दपार, सुरू `पटियाला पेग बार`

Last Updated: Saturday, August 18, 2012, 08:43

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नागपुरातल्या म्हाडा कॉलनीत असलेला पटियाला पेग बार राजरोसपणे सुरुच आहे. हा बार बंद करण्याबाबत महिलांनी मोठं आंदोलन केलं होतं. शिवाय बार बंद करण्याचा मुद्दा उच्च न्यायालयातही गेला होता.

गिरणी कामगारांचा म्हाडा लॉटरीला विरोध

Last Updated: Thursday, June 28, 2012, 06:56

गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरी प्रक्रियेला सुरूवात झालीय. मात्र ही लॉटरी थांबण्यासाठी दोन ते अडीच हजार गिरणी कामगारांनी एस व्ही रोडवर मोर्चा काढला.

म्हाडाची ४,२७२ घरांसाठी पुन्हा लॉटरी

Last Updated: Friday, June 01, 2012, 03:08

२ हजार ५९३ घरांसाठी लॉटरीची सोडत काढल्यानंतर आता पुढील वर्षी मुंबई शहरात घरे बांधण्याचा मानस म्हाडाचा आहे. म्हाडा ४,२७२ घरांसाठी पुन्हा लॉटरी काढणार आहे.

पाहा म्हाडाची सोडत झालेली यादी

Last Updated: Thursday, May 31, 2012, 10:18

म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? विजेत्यांचे 'झी २४ तास'कडून हार्दिक अभिनंदन. आपलं नाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

म्हाडाच्या लॉटरीला सुरवात

Last Updated: Thursday, May 31, 2012, 09:27

म्हाडाच्या लॉटरीच्या सोडतीला सुरुवात झाली आहे. म्हाडाने आपल्या सोडतीला सुरवात केली आहे. अवघ्या मुंबईकरांचे लक्ष ज्यांच्याकडे लागून राहिले आहे. त्याचे काही निर्णय लवकरच आपल्या समोर येतील.

पाहा म्हाडाची लॉटरी कोणाला?

Last Updated: Thursday, May 31, 2012, 06:33

म्हाडाने मुंबई आणि कोकण मंडळाअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घरांसाठीचे अर्ज भरण्यासाठी जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईटवर आपल्याला ही सोडत पाहाता येणार आहे.

मुंबईत म्हाडाचे घर कोणाला?

Last Updated: Thursday, May 31, 2012, 04:06

म्हाडाच्या २ , ५१७ घरांच्या लॉटरीची सोडत आज गुरुवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात निघणार आहे. त्यामुळे आज घरांचा भाग्यवान कोण याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

'म्हाडा'ला दलालांचा गराडा

Last Updated: Friday, May 18, 2012, 08:30

मुंबईत म्हाडाची स्वस्त घऱांसाठीची लॉटरी 31 मेला जाहीर होणार आहे. मात्र, दलालांनी आत्तापासूनच वेगवेगळे फंडे वापरायला सुरूवात केली आहे. गेल्यावर्षी बिल्डरांनी बनावट अर्ज दाखल केल्याचं उघड झालं होतं. मात्र, यावर्षी तर दलालांनी कळस गाठलाय.

'... तर किंमतीचा फेरविचार करू'

Last Updated: Monday, May 14, 2012, 14:09

म्हाडाने वाढविलेल्या घरांच्या किंमतीवर खुद्द मंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या वाढीव किंमती योग्य नसल्याचं वक्तव्य गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही केलंय.

भरा म्हाडाचा अर्ज

Last Updated: Saturday, May 05, 2012, 06:05

दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालीय. अर्ज भरण्यासाठी जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईटवर अर्जदारांच्या उड्या पडल्यानं वेबसाईट हँग झाली होती. दोन दिवस वेबसाईट हँग असल्यानं अनेकांना अर्ज भरता आले नाहीत.

म्हाडाची साईट दुस-या दिवशीही हँग

Last Updated: Friday, May 04, 2012, 03:55

मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केल्यानंतर म्हाडाचा सावळागोंधळ सुरू झालाय. अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी म्हणजे आजही म्हाडाची साईट हँग आहे. काल अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी म्हाडाची वेबसाईट हँग झाली होती.

म्हाडाची साइट हँग, मुंबईकर सफरिंग!

Last Updated: Thursday, May 03, 2012, 14:17

मुंबईकरांच्या स्वप्नातील स्वस्त घरांसाठी म्हाडाने आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली, मात्र, म्हाडाच्या साईटला भेट देणाऱ्या अनेकांची आज साईट बंद असल्याने निराशा झाली. टेक्निकल प्रॉब्लेममुळे म्हाडाची वेबसाईट बंद पडल्याचे म्हाडाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईकरांची म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा संपली

Last Updated: Tuesday, May 01, 2012, 16:52

मुंबईकरांची म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आता संपली आहे. ३ मेला म्हाडाच्या घरांची जाहीरात निघणार आहे. तर १९ मेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून ३१ मेला घरांची लॉटरी निघेल.

मुंबईकरांचे स्वस्त घराचे स्वप्न लांबणीवर

Last Updated: Sunday, April 29, 2012, 06:10

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बाबींचा फटका बसल्याने मुंबईकरांचे स्वस्त घराचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा जाहीर होऊनही लॉटरीची जाहिरात निघू शकलेली नाही. तांत्रिक घोळ संपून येत्या आठवड्यात जाहिरात काढण्याचे म्हाडाने सांगितले आहे.

मुंबईत म्हाडाची ३००० घरे उभी राहणार

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 05:55

मुंबईत घर घेणं ही प्रत्येकांची इच्छा असते. मात्र सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट झालेली आहे. यातच 'म्हाडा' ही सर्वसामान्याच्या मदतीला धावून आली आहे.

घर देता कुणी घर?

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 13:06

म्हाडाच्या खराडी प्रकल्पाच्या लाभार्थींची घराची प्रतीक्षा अजून संपलेली नाही. गेली सात वर्ष हे लोक घराचा ताबा मिळवण्यासाठी म्हाडाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र म्हाडा प्रशासन त्यांन फक्त नवी तारीख देत आहे.