मुंबईत पाऊस, रेल्वेचा बोजवारा

मुंबईकरांना पावसाने जरी मुंबईकरांना आनंदी केलं असलं, तरी बुधवारी सकाळी पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबल्यामुळे मुंबईकर हैराण झाले. आज सकाळी पाऊस थांबला असला तरी रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

Updated: Jul 4, 2012, 05:49 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईकरांना पावसाने जरी मुंबईकरांना आनंदी केलं असलं, तरी बुधवारी सकाळी पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबल्यामुळे मुंबईकर हैराण झाले. आज सकाळी पाऊस थांबला असला तरी रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. जोरदार पावसाचा रेल्वेला फटका बसला आहे. रेल्वे ट्रॅकखालील माती खचली आणि रुळांवरील खडी वाहून गेल्यामुळे रेल्वे पावसाळ्याच्या परीक्षेत नापास झाली आहे.

 

काल रात्रीपासून वांद्रे, परळ, लालबाग, दादर, महालक्ष्मी, चेंबूर, वरळी या भागात पाऊस पडला. त्यामुळे रेल्वे वाहतूकीसोबत विमान वाहतूकही खोळंबली. त्यामुळे लोकल ट्रेन्स १० ते १५ मिनीटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने रोज प्रवास करणाऱ्यांना कामावर पोहोचण्यास उशीर झाला.

 

मालाड भागातील ४ माळ्यांची इमारत पावसामुळे कोसळली. यांमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने पुढील २४ तास पाऊस चालूच राहाणार असल्याचं वृत्त दिलं आहे. दुपारी १२.५० ला समुद्राला भरती येणार असल्याने काही प्रमाणात धोका आहे. महापालिकेच्या नागरी विभागाने सहा तलावांमधील पाण्याची पातळी ११,००० दशलक्ष लिटर वाढली आहे.