रन मुंबई रन

Last Updated: Sunday, January 15, 2012 - 09:27

www.24taas.com, मुंबई

 

 हॅफ मॅरेथॉनमध्ये प्रियांका सिंग पटेल, विजयामाला पाटील  आणि सुप्रिया पाटील यांनी महिला स्पर्धकांमध्ये अनुक्रमे  पहिले, दुसरं आणि तिसरं  स्थान पटकावलं.

 

सोजी मॅथ्युजने १.०५.२९, आशिष सिंग १.०५.३१ आणि मान सिंगने १.०६.२७ अशी वेळ नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये अनुक्रम पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला

मुंबई नववी मॅरेथॉन २०१२ स्पर्धेला धडाक्यात सुरवात झाली.  सकाळी ७.२५ मिनिटांनी ४२ किलोमिटरच्या फुल मॅरेथॉन  स्पर्धेला  सकाळी प्रारंभ झाला. त्यात देशी तसंच परदेशी खेळाडु  मोठ्या  प्रमाणावर सहभागी झाले आहेत. यात २३३ परदेशी  धावपट्टुंसह  २७०८ धावपट्टू सहभागी झाले आहेत.  गुलाबी  थंडीतही मुंबईकरांनी  आज मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद दिला.  दरवर्षीप्रमाणी केनियन  आणि इथोपिअन धावपट्टूंचे वर्चस्व  यंदाच्याही मॅरेथॉन स्पर्धेवर  दिसून येत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटीज या स्पर्धेत  सहभागी झाले आहेत.  अनिल अंबानी, अनिल कपूर, गुलशन ग्रोवर अशी उद्योगजगतातली आणि बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी रन मुंबई रनमध्ये सहभागी झाले आहेत.

 

 

 

 

[jwplayer mediaid="29461"]

 

First Published: Sunday, January 15, 2012 - 09:27
comments powered by Disqus