रूपयाची मोठी घसरण

डॉलरला मागणी वाढल्याने रूपयाचे मूल्य कमी झाले आहे. एका डॉलरच्या तुलनेत ५२.८५ असे रूपयाचे मूल्य झाले आहे. ही रुपयाची सर्वात मोठी घसरण आहे.

Updated: Dec 13, 2011, 08:09 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

डॉलरला मागणी वाढल्याने रूपयाचे मूल्य कमी झाले आहे. एका डॉलरच्या तुलनेत ५२.८५ असे रूपयाचे मूल्य झाले आहे. ही रुपयाची सर्वात मोठी घसरण आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रुपयाची घसरण कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत 52 रुपयांच्या आसपास भाव असलेल्या रुपयाचा विनिमय दर 53 रुपये 29 पैशांपर्यंत पोहचलाय. विदेशी वित्तसंस्थांकडून डॉलरची मोठी खरेदी सुरु असल्यानं भारतीय रुपयाची घसरण सुरुच आहे. रुपयाची ऐतिहासिक निचांकी मानली जातेय.

 

देशातला घसरता औद्योगिक उत्पादन दर आणि भांडवली  जारातील वाताहतीमुळे परदेशी गुंतवणूक संस्थांनी भारतीय बाजारातून काढता पाय घेतलाय. याचा परिणाम रुपयाच्या विनिमय दरावर झालाय. रुपयाचा विनिमय दर घसरल्यानं भारतीय बाजारात चिंतेचं वातावरण निर्माण झालयं.

 

शेअर बाजारतील घसरण आणि डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे मंगळवारी बाजार उघडताच रुपया ५३. २९ रुपये इतक्या पातळीवर घसरला. तसेच इतर चलनांच्या तुलनेत डॉलर वधारल्यामुळेही डॉलर व रुपयाच्या विनिमय दरावर परिणाम झाल्याचे दिसून आले.  दरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकातही मंगळवारी सकाळी ६०.९८ अंकांची घसरण होऊन तो १५, ८०९ वर पोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १८ अंकांनी घसरून ४, ७४६ वर पोचला.