१३/७ बाँबस्फोट : मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल

मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसकडून मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 4 हजार 788 पानांच्या आरोपपत्रात 461 लोकांचे जबाब, साक्षी आणि सीसीटीव्ही फुटेजचा समावेश करण्यात आलाय.

Updated: May 26, 2012, 08:30 AM IST

अंजनीकुमार पांडे, www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसकडून मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 4 हजार 788 पानांच्या आरोपपत्रात 461 लोकांचे जबाब, साक्षी आणि सीसीटीव्ही फुटेजचा समावेश करण्यात आलाय.

 

मुंबईतल्या दादर, जव्हेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस इथं 13 जुलै 2011 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसकडून मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलय. 4 हजार 788 पानांची चार्जशीट तयार करण्यात आलीय आहे. आरोपपत्रात अटक केलेले आरोपी नकी अहमद, नदीम अख्तर, हारुन शेख आणि कंवर पथरिजा यांच्यावर युएपीए आणि मोक्कान्वये कलमं लावण्यात आलीयेत. शिवाय आरोपपत्रात रियाज भटकळ, यासिन भटकळ, वकास शेख, तबरेज दुबईचा हवाला व्यापारी मुजफ्फर कोल्हा आणि दरभंगा येथील तहशीन शेख अख्तर शेख यांना फरार घोषित करण्यात आलंय.

 

चार्जशीटमध्ये 461 लोकांच्या जबाबांची नोंद आहे. तसंच आरोपींना ओळखणाऱ्या 19 जणांच्या साक्षीही नोंदवण्यात आल्यात. पुरावे म्हणून 308 तासांचं सीसीटीव्ही फुटेजही कोर्टाकडं सादर करण्यात आलंय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बॉम्ब ठेवणारे कैद झाल्याचा दावा एटीएसकडून करण्यात आलाय.

 

मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी 19 मे रोजी मोहंम्मद काफिल अन्सारी नावाच्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात नंतरच्या काळात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.